सन्मा. श्री/श्रीमती ……………………………………..
…………………………………………………………..
सस्नेह नमस्कार,
‘मी मराठा प्रतिष्ठान’तर्फे मराठा लोकसमुहातील सर्व घटकांना प्रोत्साहन मिळेल, विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होईल, विद्यार्थी व गरजू घटकांना मदत, वैद्यकीय, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन, आवश्यक तेथे त्यांच्यासाठी न्यायालयीन लढा देणे. कौशल्याधारित व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन, समाजाचा प्रचार व प्रसारासाठी प्रबोधन वर्ग चालविणे, आदी उपक्रम तसेच गुणवंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मी मराठा प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली आहे.
संस्थेचे नाव : मी मराठा प्रतिष्ठान
नोंदणी क्रमांक : १) मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था १९५० च्या कलम २९ नुसार क्र. एफ-००२४५३२ (एनएसके)
२) संस्था नोंदणी अधिनियम १८६० च्या कलम २१ नुसार क्र. नाशिक/०००००३२/२०२६
कार्यक्षेत्र : संपूर्ण महाराष्ट्र
बँक खाते : कोटक महिंद्रा बँक,
करंट अकाऊंट नं. 0054472877
आयएफएससी कोड : केकेबीके0001913
‘मी मराठा प्रतिष्ठान’चे सर्व उपक्रम ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर राबविले जाणार आहेत. या समाजोपयोगी कामासाठी दानशूर हातांची गरज आहे. ‘मी मराठा प्रतिष्ठान’ला देणगी देणाऱ्यांसाठी आवश्यक त्या आयकर सवलती लागू आहेत. मराठा समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमच्या पाठिशी आर्थिक मदत उभी करून सहकार्य करावे, ही विनंती.
धन्यवाद,
– विजय बाबर (अध्यक्ष)
– अमोल कदम (उपाध्यक्ष)

