मी मराठा प्रतिष्ठान

  • संस्थेमार्फत मराठा समाजातील सर्व घटकांना आशेचा, मदतीचा व उमेदीचा हात देण्याचा प्रयत्न करणे.
  • मराठा समाजातील सर्व घटकांना प्रोत्साहन मिळेल, गुणवंताचा सन्मान होईल, उद्योजकांचा आदर्श निर्माण होईल अशा मराठा समाजातील उद्योजकांना यथायोग्य प्रसिद्धी देऊन विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे.
  • साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या मराठा समाजातील गुणवंतांचा सन्मान करणे.
    जेणेकरून मराठा समाजातील अन्य घटकांसमोर त्यांचा आदर्श निर्माण होईल.
  • समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा दूर होतील असे उपक्रम राबविणे.
    पुरोगामी विचारांची पाठराखण करण्यासाठी समाजातील घटकांना प्रोत्साहन देणे.
  • संस्थेच्या उन्नतीसाठी मराठा समाजातील घटकांची नोंदणी करणे,
    त्यांची मदत घेणे व देणगीदारांकडून मिळालेल्या देणगीतून समाजातील घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे.
  • मराठा समाजातील गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनींना विनामूल्य शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे.
    विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व शालेय सुविधा पुरवणे.
  • मराठा समाजाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन वर्ग चालविणे व व्याख्याने आयोजित करणे.
  • मराठा समाजातील घटकांची गुणदर्शन स्पर्धा, सभा व संमेलने आयोजित करणे.