संस्थेमार्फत मराठा समाजातील सर्व घटकांना आशेचा, मदतीचा व उमेदीचा हात देण्याचा प्रयत्न करणे.
मराठा समाजातील सर्व घटकांना प्रोत्साहन मिळेल, गुणवंताचा सन्मान होईल,
उद्योजकांचा आदर्श निर्माण होईल अशा मराठा समाजातील उद्योजकांना
यथायोग्य प्रसिद्धी देऊन विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे.
साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक अशा विविध
क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या मराठा समाजातील गुणवंतांचा सन्मान करणे.
जेणेकरून मराठा समाजातील अन्य घटकांसमोर त्यांचा आदर्श निर्माण होईल.
समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा दूर होतील असे उपक्रम राबविणे.
पुरोगामी विचारांची पाठराखण करण्यासाठी समाजातील घटकांना प्रोत्साहन देणे.
संस्थेच्या उन्नतीसाठी मराठा समाजातील घटकांची नोंदणी करणे,
त्यांची मदत घेणे व देणगीदारांकडून मिळालेल्या देणगीतून
समाजातील घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे.
मराठा समाजातील गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनींना विनामूल्य शिक्षण
देण्यासाठी प्रयत्न करणे.
विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व शालेय सुविधा पुरवणे.
मराठा समाजाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन वर्ग चालविणे
व व्याख्याने आयोजित करणे.
मराठा समाजातील घटकांची गुणदर्शन स्पर्धा, सभा व संमेलने आयोजित करणे.